‘त्यांच्या’ बायका, ‘त्यांची’ इभ्रत!
बायकांसंबंधीचे लेख सहसा 8 मार्चच्या निमित्ताने लिहिण्याची आपली प्रथा आहे. कारण त्या दिवशी (हल्लीच्या) भारतात बायकांचा बैलपोळा साजरा केला जातो. त्या दिवशी स्त्रियांच्या सक्षमीकरणाची, त्यांच्या आत्मनिर्भरतेची, त्यागाची, हक्कांची, मातृहृदयाची, जिद्दीची, समंजसपणाची इतकी चर्चा केली जाते की त्या उमाळ्यांनी आपले सामुदायिक सांस्कृतिक रांजण भरून वाहायला लागते. आपल्या एकंदर सार्वजनिक-सांस्कृतिक जीवनाचे उथळ व्यापारीकरण आणि माध्यमीकरण झाल्याने अलीकडे …